Tuesday, October 15, 2024
Home ताज्या जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी  ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा - चेअरमन श्री. विश्‍वास पाटील

जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी  ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा – चेअरमन श्री. विश्‍वास पाटील

जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी  ‘गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्‍यावा – चेअरमन श्री. विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणा-या गायी-म्हैशींकरीता ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षीत करुन दुग्ध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गेल्या २७ ते २८ वर्षापासून सुरु केलेली आहे.
सदरची स्‍पर्धा हि दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ कोणतीही पूर्वसूचना न  देता घेतली जाणार आहे या स्‍पर्धेसाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दिनांक २० नोव्हेंबर २०२१ अखेर दूध संस्‍थे मार्फत आपली नावे नोंद करावीत. स्‍पर्धेमध्‍ये म्‍हैस १ ते ३ व गाय १ ते ३ क्रमांक काढले जाणार आहेत. स्‍पर्धेचे नियम व अटी संस्‍थेना परिपत्रकाद्वारे पाठवले आहेत. तरी जास्‍तीत जास्‍त म्‍हैस व गाय दूध संस्‍थांच्‍या दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी संघाच्‍या वतीने आव्हान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments