Sunday, January 19, 2025
Home ताज्या अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोरअ भिनेता आर्यन हगवणेचे...

अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोरअ भिनेता आर्यन हगवणेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोरअ भिनेता आर्यन हगवणेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

कोल्हापूर/प्रतिनिधी : आला आला आला आला खुर्चीचा राजा आला’ अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले असून सत्तेसाठीच्या डावपेचांना मोठया पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. या मोशन पोस्टरच्या शेवटी एक लक्षवेधी चेहरा सत्तेच्या खुर्चीत राजासारखा बसलेला असून त्याच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे, हा चेहरा म्हणजे अभिनेता आर्यन संतोष हगवणे आहे. आर्यन या चित्रपटात राजवीर राजाराम देसाई या नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आर्यन खुर्ची या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘ऍक्ट प्लॅनेट ऍकटिंग’ अकॅडमी आणि जवळच्या भरपूर व्यक्तींकडून आर्यनने अभिनयाचे धडे घेत त्याने अभिनयाची आवड जोपासली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून फॅशन मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करून त्यानंतर आर्यनने अभिनयक्षेत्रात बरीच पारितोषिक पटकवली. चित्रपटाबद्दल बोलताना आर्यन असे म्हणाला की, “खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपट असून मी पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले’. विशेष म्हणजे आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाच्या टिझर नंतर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टर मध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासंदांचे प्रेम, प्रचार याचे हुबेबुब वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.
‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर आणि अमित बैरागी यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांची असून दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील अँड ऍक्ट प्लॅनेट यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रितम एस के पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली. खुर्चीसाठी खेळली जाणारी लढाई खेळताना त्याचा इतरांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आर्यनला या खुर्ची चित्रपटात सत्तेसाठीच्या खुर्चीवर बसलेले पाहून चित्रपटात नेमके काय घडले असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments