Monday, December 2, 2024
Home ताज्या महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक - पृथ्वीराज चव्हाणांनी कार्यकर्त्यांसह कराडात बैलगाडी चालवत...

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक – पृथ्वीराज चव्हाणांनी कार्यकर्त्यांसह कराडात बैलगाडी चालवत व्यक्त केला निषेध

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक – पृथ्वीराज चव्हाणांनी कार्यकर्त्यांसह कराडात बैलगाडी चालवत व्यक्त केला निषेध

कराड/प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे कराड तालुका काँग्रेस आक्रमक झालेली आज दिसून आली. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आज कराड शहरातून पदयात्रा काढली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत सहभागी होत बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगरीच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, नानासो पाटील, जि प सातारा चे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, राजेंद्र चव्हाण, जि प सदस्य निवासराव थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, राजेंद्र यादव (आबा), धनश्री महाडिक आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल ६९ वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवला.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, देशातील भाजप सरकारने जनतेची अवस्था केविलवाणी करुन टाकली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली २३ लाख कोटींची वसुली केली ही एक प्रकारे जनतेची लूटच आहे. मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात लोक बोलत आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आणि दुसरीकडे ३० नोव्हेंबर पासून प्रधानमंत्री गरीब कल्यान योजना बंद केली आणि गोरगरीब जनतेला महिनाकाठी मिळनारे रेशनवरील धान्य बंद करुन जनतेची फसवनुक केलेली आहे.
यापुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, भारतात मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाला असल्याचा दावा मोदींनी केला असलातरी जगात आपला क्रमांक १४४ वा आहे.याचाच अर्थ भारताच्यापुढे अजून १४३ राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रात विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तीन पक्षाच्या सरकारला दोन महिने झाले की पडेल, वर्षांनंतर पडेल, आज पडेल, उद्या पडेल अशी वल्गना, भाकित भाजपकडून केले जात होते. आता त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा नाद सोडून दिला आहे. कारण सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे यात कोणतीही शंका नाही. इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकार राजकारण करत असून यातून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम चालू आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचं काम काँग्रेस करत असून देशभर आंदोलने करून जनतेचा महागाई विरोधात आक्रोश मांडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments