Friday, December 13, 2024
Home ताज्या पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल -- आंतरराष्ट्रीय...

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल — आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल — आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली गेली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) साठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्राला अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सची ही येथे विशेष दखल घेतली गेली. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचेही पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी नमूद केले आहे.
श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गाचे सोलराइजेशन केले असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, भूगोल, वंशाच्या सीमा, राष्ट्रीयत्व किंवा लिंगभेद नसलेल्या या जागतिक समस्येवर काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि विधायक व अर्थपूर्ण कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामान कृतीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व योगदानाबद्दल अंडर२ कोईलेशनद्वारे मान्यता मिळाली याचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे.हवामान कृतीसाठी वचनबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या जागतिक नेटवर्क अंडर२ कोईलेशनतर्फे उपराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. तर, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी आणि हवामान भागीदारीसाठी क्‍वेबेक (कॅनडा) यांनी इतर दोन पुरस्कार जिंकले. महाराष्ट्राने अंडर२ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या.संयुक्त राष्ट्रांच्या ‘रेस टू झिरो’ उपक्रमामध्ये तसेच जागतिक स्तरावर हवामान बदलाबाबत संबोधित करण्यासाठी सी-४० शहरांच्या उपक्रमात देखील महाराष्ट्र सामील झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments