खासदार संभाजीराजे यांच्या समोर महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
कोल्हापूर/प्रतिनिधी : नागपूर रत्नागिरी महामार्ग क्र.१६६ मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यासंदर्भात सुमारे दीडशे ते पावणे दोनशे बाधीत शेतकऱ्यांनी आदरणीय खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले.तसेच हा महामार्ग वाठार मार्गे करावा अशी आमची मागणी आहे असे बाधीत शेतकऱ्यांनी संभाजीराजेना निवेदन दिले. या संदर्भात काही लोक अफवा पसरवीत आहेत की डिसेंबर पूर्वी ताबा नाही दिला तर मिळणारी नुकसान भरपाई ही चार पट ऐवजी दोन पटच मिळणार आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या सह्या त्यांच्याकडून दिशाभूल करून घेतल्या गेल्या आहेत.
पाचपट रक्कम मिळाल्यास आमची तयारी आहे आशा प्रकार च्या निवेदनावर शेतकऱ्यांच्या सह्या दिशाभूल करून घेतल्या होत्या.वस्तुस्थिती समजल्यावर ते सर्व शेतकरी सावध झाले असून या संदर्भात पालकमंत्री आदरणीय श्री सतेज पाटील यांच्या सोबत महामार्ग अधिकारी आणी लोकप्रतिनिधी यांची बैठक लवकर घ्यावी यासंदर्भात स्वतः खासदार संभाजी राजें यांनी पुढाकार घ्यावा आशा प्रकारचे निवेदन खासदार संभाजीराजे यांना देण्यात आले.या वेळी शिये ते कुशीरे, पडवळवाडी या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.