Friday, July 19, 2024
Home ताज्या शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं निधन

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं निधन

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं निधन मंगळवारी सकाळी १० वाजता कदमवाडी शिवराज कॉलनी इथल्या त्यांच्या निवासस्थाना पासून निघणार अंत्ययात्रा
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबा सावंत यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. मृत्यूसमयी ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळं शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरलीय. पन्हाळा गगनबावडा तालुक्याचे माजी आमदार आत्माराम सावंत यांचे सुपुत्र शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचं आज दुपारी 3 च्या सुमाराला निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत सावंत यांचा मोठा हातभार होता. १९९८ पासून ते शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या अनेक प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात हातखंडा असल्यामुळं त्यांनी राज्यभरातील विद्यापीठात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे ते सदस्य होते. मनोयुवा जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. सीपीआरचे आरोग्यदुत बंटी सावंत यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कदमवाडी शिवराज कॉलनी इथल्या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments