Friday, July 19, 2024
Home ताज्या सतत सकारात्मक राहणे हाच यशाचा मूलमंत्र - डॉ. डी. वाय. पाटील यांचे...

सतत सकारात्मक राहणे हाच यशाचा मूलमंत्र – डॉ. डी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन, ८६ व्या वाढदिनी शुभेश्चांचा वर्षाव

सतत सकारात्मक राहणे हाच यशाचा मूलमंत्र –
डॉ. डी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन, ८६ व्या वाढदिनी शुभेश्चांचा वर्षाव

कसबा बावडा / प्रतिनिधी
आनंदी व उत्साही आयुष्य जगण्यासाठी अहंमपणा, मत्सर आणि द्वेश यांचा त्याग करणे गरजेचे आहे. सतत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल असा मूलमंत्र शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांनी दिला. ८६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेश्चाचा वर्षाव करण्यात आला.
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक व त्रिपुरा, बिहार, प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शुक्रवारी वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण केले. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने कसबा बावडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ८६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे दादासाहेबांनी स्थापन केलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपमधील पहिले अभियांत्रिकी महविद्यालय असलेल्या कसबा बावडा येथील महाविद्यालयात हा सोहळा आयोजित करण्याचा योग यानिमित्ताने जुळून आला. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमस्थळी दादासाहेबांचे आगमन होताच विद्यार्थी व सर्व पदाधिकारी,कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात व ऑर्केस्ट्राच्या संगीतावर दादासाहेबांना अभिवादन केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील डिझाईन इनोव्हेशन लॅबचे उदघाटन पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस केक कापून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा साजरा करण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, शांतिनिकेतनचे कार्यकारी संचालक करण काकडे, डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता, सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, अजितराव पाटील-बेनाडीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थिताना आशीर्वादपर मार्गदर्शन करताना आयुष्य हे उत्साही आणि आनंदी जगले पाहिजे असे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितले. आपल्यामधील दुर्गुण बाजूला केल्यास नक्कीच चांगले जीवन जगता येईल. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अहंम, मत्सर आणि द्वेश या गोष्टी टाळून प्रयत्न करावेत असा मूलमंत्र त्यांनी दिला.
यावेळी कला, क्रीडा, समाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू शिम्पा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, सीएचआरओ श्रीलेखा साटम, तळसंदे विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. जयेंद्र खोत संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, साळोखेनगर कॅम्पसचे समन्वयक डॉ. अभिजित माने, मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. आर. बेलेकर, डी. वाय. पाटील साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक जयदीप माने, गारगोटी कॅम्पसचे विजय घोलपे, प्रोजेक्ट टीमचे एस. बी. सबनीस, हॉटेल सयाजीचे डेप्युटी जनरल मनेजर मुकेश रक्षीत, डी. वाय. पी. हॉस्पिटलिटीचे तुषार भोसले यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व संस्थांचे प्रमुख, सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कुटुंबियांकडून औक्षण
दादासाहेबाच्या कुटुंबीयांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज डी. पाटील, सौ. राजश्रीताई काकडे, श्री. मेघराज काकडे, विश्वस्त श्री. पृथ्वीराज पाटील, शांतिनिकेतनचे कार्यकारी संचालक श्री. करण काकडे , सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. डॉ. चैत्राली करण काकडे आदी उपस्थित होते.
सिम्युलेशन लॅबचा पहिला वर्धापन दिन
डी. वाय. पाटील हॉस्पीटल येथील अत्याधुनिक सिम्युलेशन लॅबचा पहिला वर्धापन दिन शुक्रवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गतवर्षी दादासाहेबांच्या हस्ते या लबचा शुभारंभ झाला होता. ही लब वैदकीय विद्यार्थी व डॉक्टरांसाठीही अत्यंत सहाय्यभूत ठरत असून या माध्यमातून कुशल डॉक्टर तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments