Thursday, July 18, 2024
Home ताज्या दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार नामदार सतेज पाटील यांची घोषणा

दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार नामदार सतेज पाटील यांची घोषणा

दरवर्षी पाच जिल्ह्यांमध्ये फेन्सिंग हॉल उभारणार
नामदार सतेज पाटील यांची घोषणा

३२ व्या राज्य फेन्सिंग स्पर्धेचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येतील अशी घोषणा महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व राज्याचे गृह राज्यमंत्री नाम. सतेज पाटील यांनी केली आहे. ३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महराज यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला.
३२ व्या वरिष्ठगट राज्यस्तर फेन्सिंग (तलवारबाजी) अजिंक्यपद स्पर्धेला आज सुरवात झाली आहे. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्त्याखाली कोल्हापूर फेन्सिंग (तलवारबाजी) असोसिएशन, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात ही स्पर्धा होत आहे.
यावेळी बोलताना ना. सतेज पाटील यांनी, दरवर्षी पाच जिल्ह्यात केवळ फेन्सिंग खेळासाठी हॉल उभे करण्याची घोषणा केली. फेन्सिंग खेळ राज्यात एक नंबरचा बनविण्यासाठी येणाऱ्या काळात आपले प्रयत्न असतील. कोरोना कालावधीनंतर प्रथमच राज्यस्तरवरील मोठ्या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
फेन्सिंग मधला कोणताही खेळाडू आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहू नये यासाठी अशा खेळाडूंना असोसिएशनकडून दत्तक घेऊन आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शैर्याची भूमी आहे. याठिकाणी होणाऱ्या स्पर्धेतून राज्याचा संघ निवडला जाणार आहे. जानेवारीमध्ये पतियाळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी २४ खेळाडूंचा हा संघ प्रतीनिधीत्व करेल. तेथेही हे खेळाडू महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकवतील असा विश्वास ना. सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तसेच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा खेळाडू महाराष्ट्राचा असेल असा संघटनेचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.
डीपीडीसीमधून नाविन्यपूर्ण योजनेतर्गत या खेळासाठी साहित्य उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा पहिला जिल्हा आहे. अशाचप्रकारे अन्य जिल्ह्यानीही निधी द्यावा यासाठी पालकमंत्र्यांना पत्र लिहिणार आल्याचे त्यांनी सांगितले. हा क्रिडा प्रकार बळकट करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न आहेत. यासाठी येणाऱ्या सुचनाचेही स्वागत असल्याचे सांगत पाटील यांनी आपला मोबाईल क्रमांक त्यासाठी जाहीर केला.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी, जो पर्यत एखाद्या खेळाला शासन आश्रय मिळत नाही, तो पर्यत कोणताही खेळ पुढे येऊ शकत नाही. क्रिकेट सोडून इतर खेळातही शासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. तलवारबाजी हा पारंपारिक खेळ असून त्यांच्या आधुनिक स्वरूप असलेल्या फेन्सिंग कडे जास्तीत जास्त खेळाडूंनी वळावे असे आवाहन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राकेशकुमार मुदगल, यांनी खेळामध्ये जय- पराजय होत असतो, मात्र जिंकणाऱ्या खेळाडूने अहंकार न ठेवता, अधिक चांगल्या प्रकारे खेळासाठी प्रयत्न करणे गरजेच असल्याच सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून ऑलम्पिक स्तरावरील खेळाडू बनतील. असा विश्वास व्यक्त करत या स्पर्धेच्या माध्यमातून मिशन ऑलम्पिकची सुरवात झाल्याचही त्यांनी सांगितलं शाहू महाराजांच्या उपस्थितीने, तलवारबाजीला राजा आश्रय मिळाला, असल्याचं सांगितले. या स्पर्धेमुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आहे. सर्व महाविद्यालयानी यामध्ये सहभाग नोंदविण्याची आपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान इपी, फॉईल व सेंबर या तीन प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ५०० खेळाडू सहभागी झालेत. या स्पर्धेच्या उद् घाटन सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए के गुप्ता, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, सल्लागार अशोक दुधारे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ चंद्रशेखर साखरे, विनय जाधव, स्पर्धा संयोजक समितीचे अध्यक्ष संजय जाधव आदींची उपस्थिती होती.

स्पर्धा सर्वांना पहाण्यास खुली

ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी पाहण्यास खुली आहे. फेन्सिंग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व या खेळाला अधिक प्रतिष्ठा मिळावी यासाठी क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments