कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सक्तीचे
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : दोन वर्षांमध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले आहे.यामुळे कोल्हापुरातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या देवी अंबाबाईचे दर्शन असंख्य भाविकांना होऊ शकले नाही दोन वर्ष मंदिर बंद आहे मागील वर्षी देवीचे दर्शन टी. व्ही वर झाले होते. मात्र मंदिर परिसर मात्र नेहमीच भरलेला असायचा तो मात्र सुनासुना होता यावर्षी मंदिराची दारे नवरात्र उत्सव पासून सुरू होणार आहेत मात्र पूर्वीप्रमाणे आता गर्दी करून हे दर्शन भाविकांना घेता येणार नाही कारण अंबाबाईच्या दर्शनासाठी आता भाविकांना ऑनलाईन बुकींग करावे लागणार आहे या बुकिंग मध्ये ठराविक वेळ ही भक्तांना दिली जाणार आहे आणि त्यावेळेस भक्तांनी येऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे आहे आणि पुन्हा दर्शन घ्यायचे असेल तर पुन्हा ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे त्यानंतरची ही वेळ भाविकांना द्यावी लागणार आहे त्यामुळे दोनदा दर्शन घ्यायचे असेल तर दोनदा ऑनलाईन बुकिंग करणे भक्तांना गरजेचे आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या व देशभराच्या कोल्हापूरमध्ये दाखल होत असतात पार्किंगचा नेहमीच बोजवारा उडालेला असतो मात्र कोरोनाच्या या वातावरणामुळे गेल्या दोन वर्षापासून कोल्हापूरच्या देवी अंबाबाईच्या दर्शनामध्ये विग्न ही आलेली आहेत आताही मंदिरांचे दार सर्वांसाठी खुले केले आहे मात्र ऑनलाईन बुकींग केल्याशिवाय कोणालाही देवीचे दर्शन होऊ शकणार नाही शिवाय ज्येष्ठ नागरिकांना मंदिरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे दहा वर्षाच्या आतील मुलांना ही मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी काही महत्त्वाचे निर्णय हे स्थानिक पातळीवर प्रशासनाने निर्णय घेतले आहेत त्यामुळे मागून येणाऱ्या भाविकांना स्वतःहून दर्शन घेऊन जावे लागणार आहे त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मंदिरात घेतले जाणार नाही त्याचबरोबर देवीच्या मुखदर्शनाची नेहमी सोय ही गरुड मंडपात केलेली असते मात्र यावर्षी हे मुखदर्शन मंदिराच्या बाहेरील बाजूने भाविकांना द्यावे लागणार आहे स्क्रीन लावण्यात येणार आहे त्याठिकाणी देवीचे ऑनलाईन दर्शन भाविकांना होणार आहे त्यामुळे विनाकारण गर्दी करणाऱ्यांना मात्र चाप बसणार आहे ऑनलाईन दर्शनाची सोय केली गेल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास कमी होणार आहे. त्यानुसार त्यांना प्रवेश हा दिला जाणार आहे. अंबाबाईच्या मंदिरात नेहमी भाविकांची गर्दी असते. यावर्षी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या भक्तांना महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी आधार कार्ड असेल त्यांना ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.त्यामुळे देवीच्या दारापर्यंत दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग आधार कार्ड शक्तीचे केले आहे.