त्रिसदस्सीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अनेक भागात शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आघाडी घेतल्याचे चित्र तयार झाले. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेक इच्छुकांची घालमेल होणे सहाजिकच आहे. परंतु, कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. जे झाले ते चांगलेच झाले असून, त्रिसदस्सीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे. आसपासच्या प्रभागातील इच्छुकांनी एकसंघ होवून कामाला लागावे. पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीसह इतर माध्यमातून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचवावे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागा. शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुक आणि तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा राजर्षि शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडला.
मेळाव्याच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी” “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे साहेब” यांच्या विजयाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मागच्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला तर दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे २० ते २५ उमेदवार दोन नंबरला असल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकत आहे त्यामुळे बदलेल्या प्रभाग रचनेनुसार शिवसेनाही नवीन रणनिती आखणार असून, कोणत्याही परिस्थिती यावेळी शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकविण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री नामदार श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांची लोकप्रियता, शिवसेनेची ताकत आणि उमेदवारांची एकसंघता या बळावर शिवसेना निवडणुकीस सामोरे जाणार असून, शिवसेनेचा महापौर होईल यात तिळमात्र शंका नाही. शिवसेनेत काम करणाऱ्याला योग्य संधी आणि न्याय मिळतो याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. सर्वसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी शिवसेनाच नेहमी रस्त्यावर उतरते, हे सुज्ञ जनतेला माहित आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करा, लागणारी ताकत, प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणच उमेदवार समजून कामाला लागावे. गेल्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकींचा अनुभव आपल्या पाठीशी असून, बदलेल्या प्रभाग रचनेचा सर्वात जास्त फायदा शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे एकसंघ होवून शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकविण्यासाठी कामाला लागा, अशा सूचनाही श्री.राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना केल्या.
यावेळी बोलताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रघुनाथ खडके यांनी, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रभागामध्ये काम करणारे शिवसैनिक तयार करण्याची जबाबदारी सोपविली असून, मुख्यमंत्री साहेबांच्या संकल्पनेनुसार प्रभाग तिथे शाखा आणि घर तिथ शिवसैनिक तयार करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना केल्या.यावेळी बोलताना माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी, बदललेल्या प्रभाग रचनेनंतर शिवसेनेचे पारडे अधिक जड असून, राज्यात, शहरात शिवसेना असावी, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या जनहिताच्या कामामुळे शिवसेनेची वोट बँक वाढली असून, त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना होणार आहे. होणारी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या इराध्याने काम करून दाखवूया आणि शिवसेनचा महापौर करण्यास कटिबद्ध राहूया, असे आवाहन केले.
यावेळी माजी परिवहन सभापती नियाज खान यांनी, गेल्या महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ४ होते. पण, चारही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर पकड ठेवली होती. श्री.राजेश क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरात भगव वादळ निर्माण झाले असून, कोट्यावधी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला आहे. त्यामुळे जनसामान्यात शिवसेनेविषयी आस्था निर्माण झाली असून,शाखांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. शिवसेनेचा माध्यमातून शहराचा विकास करण्याची संधी निर्माण झाली असून, शिवसेनेचा महापौर होईल यात कोणतीही शंका नसल्याचे सांगितले.
यावेळी बोलतना माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांनी, समन्वय साधून इच्छुकांनी कामाला लागावे. संभाव्य भाग समजून घेवून जनसंपर्क वाढवावा. जेष्ठांशी, युवकांशी, भगिनींशी आणि शिवसेनेच्या विचार धारेत सामावणाऱ्यांशी संपर्क साधावा. एकदिलाने काम करून शिवसेनेचा महापौर करण्यास वचनबद्ध राहू, असे प्रतिपादन केले.या मेळाव्याचे सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महेश उत्तुरे, सुहास सोरटे, माजी नगरसेवक अजित मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगले, दीपक गौड, किशोर घाटगे, अभिषेक देवणे, रघुनाथ टिपुगडे, महिला आघाडी शहर संघटिका सौ.मंगलताई साळोखे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते, जिल्हा समन्वयक योगेश चौगले, शहर अधिकारी अँड.चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे, महिला आघाडीच्या सौ.पूजाताई भोर, सौ.शारदा भोपळे, सौ.पूजा कामते, सौ.मंगलताई कुलकर्णी, रुपाली कवाळे, सौ.शाहीन काझी यांच्यासह शिवसेनेचे उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, इच्छुक उमेदवार, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.