प्रेमप्रकरणातुन पन्हाळा तालूक्यातील सातवे येथे तरूणाचा खुन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात युवकाचा निर्घृण खून झाला आहे. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृत युवकाचे नाव विनायक घाटगे (वय १८) असे आहे. तो मोन्या नावाने परिचित होता. त्याचे गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे. विनायकला मांगले गावाच्या हद्दीमध्ये बेदम मारहाण झाली होती. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या विनायकचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतर पन्हाळा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. विनायकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला असून संशयित आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.