Friday, December 13, 2024
Home ताज्या रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार माजी मुख्यमंत्री...

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार

कराड/ प्रतिनिधी : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन उभारला जाणार आहे. व जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण ५१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. व त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. व नवीन पुलाचे दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची आ. चव्हाण यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे – पाटील, शिवाजीराव मोहिते, जे. डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण – पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई सुतार, दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी, बिपीन उर्फ सनी मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरुवातीस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आ. चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतला. नवीन पुलाचे २० मीटरचे १५ गाळे तयार होवून तो सद्याच्या पुलापेक्षा १२ फूट उंच होणार आहे. त्याचा पाया भक्कम असेल. व तो तयार झाल्यानंतर त्याची भार क्षमता चाचणी केली जाणार आहे. येत्या मे अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. असे अधिकाऱ्यांनी आढाव्यात नमूद केले.
आ. चव्हाण म्हणाले, जुना पूल 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंची होवून अद्ययावत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पुल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments