Wednesday, October 9, 2024
Home ताज्या कोल्हापूर ब्लड डोनर अँप महत्त्वपूर्ण ठरेल आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर ब्लड डोनर अँप महत्त्वपूर्ण ठरेल आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर ब्लड डोनर अँप महत्त्वपूर्ण ठरेल
आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या डिजिटल युगात कोल्हापूर ब्लड डोनर अँप महत्त्वपूर्ण ठरेल, असा आशावाद आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्यक्त केला.येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर येथे जिव्हेश्वर फौंडेशनची निर्मिती असलेल्या ब्लड डोनर कोल्हापूर अप लाँचच्या प्रसंगी ते बोलत होते.
जिव्हेश्वर फौंडेशनचे अध्यक्ष रजत ओसवाल यांनी स्वागत केले. ते म्हणाले, एखाद्या रुग्णाला हवा असणारा रक्तगट ऐनवेळी शोधण्यासाठी धावपळ करावी लागू नये, या उद्देशाने ब्लड डोनर कोल्हापूर अपची निर्मिती केली आहे. यामध्ये अप डाऊनलोड केल्यास रजिस्ट्रेशन होऊन संबंधिताला नोटिफिकेशन मिळेल आणि रक्ताची गरज त्वरित पूर्ण होईल.
जिव्हेश्वर फौंडेशनच्या यंग टीमने ब्लड डोनर कोल्हापूर अप तयार केले असून त्याचा पुढील तीन वर्षांचा येणारा खर्च रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी करेल. संबंधित रक्तदात्याला ही सेवा मात्र पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, अत्यंत उपयोगी असलेल्या या अपमुळे रक्तदात्याची गरज त्वरित पूर्ण होईल. दीपा शिकारपूर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. रोटेरियन उदय दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.कोरोना योद्धे, पूरग्रस्तांना मदत केलेले व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, रोटेरियन वारणा वडगावकर, सचिव रोटेरियन संजय जाधव, खजानिस रोटेरियन महेश ढवळे, श्वेता नोतानी, उत्कर्ष फडणीस, रोटेरियन बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, दिलीप पाटील यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

चौकट
एसडीपीसी मशीनबद्दल आमदारांची तत्परता
दरम्यान, सीपीआर हॉस्पिटल येथे प्लाझ्मा थेरपीसाठी आणलेले एसडीपीसी मशीन एक वर्षापासून बंद आहे. त्याचा उपयोग सध्या डेंग्यू उपचाराचा त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार असून ते त्वरित सुरू करावे, अशी माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी कार्यक्रमावेळी देण्यात आली. त्वरित श्री. जाधव यांनी त्याचा पाठपुरावा करून येत्या दोन दिवसांत मशीन सुरू होईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments