Friday, September 20, 2024
Home ताज्या पश्चिम महाराष्ट्रातील सराफ बाजार आज बंद एचयूआयडी हॉलमार्कला विरोध- भरत ओसवाल

पश्चिम महाराष्ट्रातील सराफ बाजार आज बंद एचयूआयडी हॉलमार्कला विरोध- भरत ओसवाल

पश्चिम महाराष्ट्रातील सराफ बाजार आज बंद
एचयूआयडी हॉलमार्कला विरोध- भरत ओसवाल

कोल्हापूर/प्रतिनिधी : एचयूआयडी हॉलमार्कला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सराफ बाजार उद्या बंद राहणार असल्याची माहिती नॅशनल टास्क फोर्स सदस्य भरत सोनमल ओसवाल यांनी आज दिली.
श्री. ओसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने १६ जून २०२१ पासून केलेल्या हॉलमार्कचे सर्वच सराफ व सुवर्णकारांनी स्वागत केले आहे. कारण यामुळे पारंपरिक वर्षानुवर्षे प्रत्येक पेढीशी जोडला गेलेल्या आमच्या सन्माननीय ग्राहकाला योग्य वजनाचा दागिना तर मिळेलच शिवाय आमचाही व्यवसाय वाढेल, मात्र एचयूआयडी हॉलमार्कमधील काही क्लिष्ट तरतुदींना आमचा विरोध आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्याचा लाक्षणिक बंद आयोजित केला आहे. याच्या माध्यमातून सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आमच्या समस्या पोचवू शकू. कारण हॉलमार्क लागू केले मात्र देशात आज फक्त २५६ ठिकाणी हॉलमार्क सेंटर आहेत की जी दागिने हॉलमार्क करण्यासाठी पुरेशी नाहीत. तरीही सराफ व्यावसायिकांना हॉलमार्कचे स्वागत केले आणि १ जुलैपासून २०२१ पासून एचयूआयडी हॉलमार्क सक्तीचे केले आहे. एचयूआयडी म्हणजे हॉलमार्क यूनिक आयडेंटीफिकेशन नंबर. दागिन्यांवर या अगोदर चार मार्क करण्यात येते होते. त्यामध्ये बीएसआय लोगो, शुद्धता,  हॉलमार्क सेंटर आणि ज्वेलर्स असे लोगो असत. यामध्ये बदल करून केंद्र सरकारने तीन लोगो केले आहेत. त्यामध्ये बीएसआय, शुद्धता आणि एचयूआयडी असे तीन लोगो आवश्यक केले आहेत. मात्र एचयूआयडीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. कारण यासाठी अजूनही देशभरात पूर्ण तयारीनिशी त्यासाठी आवश्यक हॉलमार्क सेंटरची उभारणी झालेली नाही. या अगोदर दागिना हॉलमार्कसाठी दिला तर तो साधारण पाच ते सहा तासांत परत मिळत होता. मात्र एचयूआयडी प्रक्रियेत किमात सात ते आठ दिवसांनी एखादा दागिना आम्हाला परत मिळू शकणार आहे. अशावेळी ग्राहकाला त्याच्या कार्यक्रमादिवशी  दागिना कसा काय वेळेत देऊ शकू. मात्र यामुळे सरकारी अधिकाऱ्याला या तांत्रिक कारणाने काही वेळेला दागिना हॉलमार्क झालेला नाही आढळला तर तो दुकानाचा परवाना रद्द करू शकतो. म्हणजे पिढ्यान पिढ्यान मिळविलेला नावलौकिक एका आदेशाने मातीमोल करावयाचा का. अशा समस्या इनस्पेक्टर राजच्या माध्यमातून आम्हासमोर उभा राहतील. अगोदरच कोरोनामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही नाईलाजाने आम्हाला उद्याचा बंद करावा लागत आहे. जर यामध्ये सुधारणा नाही केली तर सुवर्ण नियंत्रण कायद्याच्या वेळी उदभवलेली परिस्थिती पुन्हा येऊ शकते. यामुळे जवळपास ५० ते ६० टक्के सराफ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करावा लागेल. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोकण, बेळगाव व गोवा येथील सराफ संघटनांच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणे झाले असून आम्ही आमच्या येथील बाजार १०० टक्के बंद ठेवून पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्या दुकाने बंद असल्याने ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल सर्वांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. दरम्यान, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले की, सराफ संघाबरोबर संघाशी संलग्न सर्व संस्थांच्या वतीने आम्ही बंदमध्ये १०० टक्के सहभागी होणार आहोत. उद्या ११ वाजता गुजरी येथे मूक निदर्शने करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments