नात्याला विश्वास देणारी प्रेम कथा जीव माझा गुंतला – योगिता चव्हाण
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापुरी बाज असलेली मालिका म्हणजे जीव माझा गुंतला होय यामध्ये भूमिका मला करायला मिळाली त्यामुळे मी खूप खुश आहे . अंतरा व मल्हारची गोड प्रेम कथा आहे. अंतरा आणी मल्हार म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकांचे विचार आहेत अंतरा तिचं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवते ती भावनिक अशी आणि नात्याला विश्वास देणारी आहे. अंतरा रिक्षा सोबत बोलते तिची काळजी घेते अशी वेगळी भूमिका मला जीव माझा गुंतला या मालिकेतून करायला मिळाली आहे. कोल्हापूरच्या रिक्षावाली ची भूमिका करण्याची संधी मला मिळाली तशी ही संधी चांगली आहे पण आव्हानात्मक आहे. ही भूमिका करताना मला खूप मजा आली प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमध्ये अंतराची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे त्याबरोबरच महिलांनी रिक्षा चालवायची पद्धत आता आपल्याकडे आली आहे त्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे असे मला वाटते. कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी ही मालिका आहे असे मत यावेळी योगिता चव्हाण यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं आता वेगळ्या वळणावर आहे. श्वेता पत्रिकांची अदला बदली करते हे खानविलकर कुटुंबाला माहीत नाही. त्यामुळे श्वेता व मल्हार च लग्न ठरलं खरतर अंतराच्या पत्रिकेत दोष आहे. नियती कुठेतरी हे तर संदेश देत नाहीये ना की मल्हार आणि अंतरा एकत्र यावे. काय आहे नियतीच्या मनात ? चित्रा काकी श्वेताचं पूर्ण कुटुंबाच्या समोर आणू शकेल ? आता पुढे काय होणार हे १६ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला या मालिकेत पाहणे रंजक ठरणार आहे.