येत्या मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर शासनाची मदत पोहोचवणार – पालकमंत्री सतेज पाटील यांची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत माहिती दिली
कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात झालेल्या प्रलयकारी महापुराचे पंचनामे येत्या मंगळवारपर्यंत पूर्ण होतील यानंतर राज्य शासनाकडून आलेली मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.कोल्हापूर जिल्ह्याला यंदाही महापुराचा प्रचंड फटका बसला, जिल्ह्यातील सुमारे 80 गावांना महापुराच्या पाण्याने वेढा दिला. या पूरग्रस्त भागांचे पंचनामे मंगळवार पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, यानंतर राज्य शासनाकडून प्राप्त झालेली १७ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या मार्फत केला जाणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालक मंत्री पाटील पुढे म्हणाले, पूरग्रस्तांना मदतीसाठी लावण्यात आलेले निकष जाचक असल्याचे काहींचे मत आहे मात्र हे प्रश्न चर्चेने सोडवण्यासाठी आहेत त्यासाठी आंदोलन, मोर्चाची गरज नाही शासनाला थोडा वेळ देण्याची विनंती पाटील यांनी केली. शहरातील ३४ वर्ड पूर बाधित आहेत, राज्य शासनाकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी दोन टप्प्यात मिळणार आहे. पुराने बाधित झालेल्या भागांना प्राधान्य देऊन या ठिकाणची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.