Tuesday, July 23, 2024
Home ताज्या शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे-अशोक रोकडे शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोवीड सेंटरला...

शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे-अशोक रोकडे शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोवीड सेंटरला फळे वाटप

शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद आहे-अशोक रोकडे शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोवीड सेंटरला फळे वाटप

कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे काम नेहमीच कौतुकास्पद असून संघटना नेहमी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत असते. याबद्दल संघटनेचे कौतुक असल्याचे मत व्हाईट आर्मी चे प्रमुख अशोक रोकडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने व्हाईट आर्मीने चालवलेल्या सेंटरमधील लोकांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी शिक्षक समिती शिक्षकांच्या हक्का बरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून नेहमी अडचणीच्या वेळी समाजाला मदत करत आल्याचे तसेच वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवत आल्याची माहिती दिली. यामध्ये पूरग्रस्तांना जेवण वाटप, लॉक डाउन काळात अन्नधान्याचे गरजूंना वाटप, औषधोपचारासाठी मदत, पुरामुळे घर जमीनदोस्त झालेल्याचे पुनर्वसन करण्यासाठी मदत, आयसोलेशन व पंचगंगा हॉस्पिटल ला औषधोपचाराची मदत अशा विविध मार्गाने शिक्षक समिती नेहमी गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपत आल्याची माहिती यावेळी दिली. राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी व्हाईट आर्मीने चालवलेल्या कोवीड सेंटर चे काम अत्यंत चांगले असुन कोरोनाग्रस्त नागरिकांना शंभर टक्के बरे करण्याचे काम या ठिकाणी केले आहे हे फार मोठे काम असून त्याबद्दल सर्व टीमला धन्यवाद दिले. यावेळी शिक्षक समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस संजय कडगावे ,राज्य प्रतिनिधी उत्तम कुंभार, कार्याध्यक्ष सुभाष धादवड, सुनील पाटील,अनिल शेलार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments