प्रयाग चिखली गावात कर्पूरा तुळस ५०० रोपे लागवड व वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री संत सदगुरू बाळू मामा वृक्षारोपण संकल्पना केरली द्वारा वृक्षमित्र पंडित माने व नवनाथ माने यांनी बिरदेव मंदिर चिखली गावात कर्पूरा तुळस लागवड व वाटप केले.सदर वृक्षारोपण करण्यासाठी प्रया ग चिखली गावातील तरुणांनी भरपुर सहकार्य केले.महिलांनी तुळस मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मा.प्रभाकर पाटील, सुनिल कुरणे मा एस. आर. पाटील, रघूनाथ पाटील, संपत दळवी, पत्रकार शहाजी पाटील प्रयाग चिखली धनगर समाज यांचे योगदान लाभले.महापुरामुळे सर्व तुळस नष्ट झाली आहे सदर रोपे लागवड केल्याने गावात वातावरण चांगले निर्माण होइल समाजात असे कार्य करण्याची गरज आहे ऑक्सिजन मिळणं कठीण आहे त्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.म्हणूनच वृक्षमित्र पंडीत माने यांनी पर्यावरण कार्य उभे करुन सामाजिक प्रगती साधली आहे.
भविष्यात पशू पक्षी यांना चारा निर्माण होइल असे कार्य करण्यासाठी प्रयाग चिखली गावातून सहकार्य राहिल असे अभीवचन दिले.कर्पूरा तुळस लागवड व वाटप केले त्याचे संगोपन चांगले करु असे अभीवचन दिले.