भारतीय जनता पार्टीच्या मंगळवार पेठ मंडल अध्यक्षपदी श्री. सुधीर देसाई यांची निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष पदी श्री सुधीर बाबुराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांनी हे पत्र त्यांना नुकतेच दिले आहे देश व समाजाप्रती वैचारिक उन्नती करून सशक्त राष्ट्रभक्त आदर्श नागरिक निर्माण करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून पूर्णतः देशासाठी समर्पित असणाऱ्या या पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग हसणारा कार्यकर्ता लक्षात घेऊन श्री सुधीर देसाई यांची ही निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे निवडीसाठी प.दे. स अध्यक्ष महेश जाधव,सरचिटणीस विजय जाधव व गणेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.