Saturday, July 13, 2024
Home ताज्या मसाई पठारावरून चारचाकी दरीत कोसळली - एक ठार,दोन जण जखमी

मसाई पठारावरून चारचाकी दरीत कोसळली – एक ठार,दोन जण जखमी

मसाई पठारावरून चारचाकी दरीत कोसळली – एक ठार,दोन जण जखमी

पन्हाळा /प्रतिनिधी : मसाई पठारावरून चारचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये  एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातातील तिघेजण इचलकरंजी येथील कबनुर गावातील आहेत असे अपघात स्थळावरून समजले आहे.या अपघाताविषयी घटनास्थळावरून मिळलेल्या माहीती नुसार इचलकरंजीतील तीन तरूण आखाडी साजरी करण्यासाठी मसाई पठारावर गेले होते. पठाराच्या वेखंडवाडीकडील बाजूस चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून पुष्पक लिगडे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर गाडीतील अमित गुप्ता आणि निखील शिंगे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेवून, जखमींना दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची घटनास्थळी चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments