कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
कोल्हापूर/प्रतिनिधी : जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते त्यानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून आज कोल्हापूरसह सांगलीत शहरात जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते दिवसभर हवेमध्ये प्रचंड उकाडा होता गेल्या चार पाच दिवसापासून उकाडा प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे रोज सायंकाळी पाऊस पडू लागला आहे.तौक्ते चक्रीवादळ झाल्यापासून सर्वत्र पाऊस चांगल्या प्रमाणात पडत आहे कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत आहे आजही मोठ्या प्रमाणात पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात बरसला त्यामुळे शेतीच्या कामाला आता गती येणार आहे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून सर्वत्र पोषक वातावरण शेतीसाठी तयार झाले आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.