संभाजीनगर येथे रिक्षा चालकांना धान्य व किराणा साहित्याची मदत
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोरोना काळातही संभाजीनगर प्रभागात सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या रिक्षा चालकांना एक महिना पुरेल इतके धान्य व इतर किराणा साहित्याचे वाटप माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते यांनी केले.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता सध्या सुरू असलेल्या राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वच घटकांना त्याचा फटका बसलेला आहे परंतु हातावर पोट असलेल्या लोकांची अडचण लक्षात घेता “प्रभागात इतरवेळी सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या रिक्षा चालकांना” कुठेतरी सहकार्य करणे गरजेचे होते या गोष्टीचा विचार करून काल जुने एनसीसी ऑफिस रिक्षा स्टॉप जवळ प्रभागातील रिक्षाचालक धान्य व इतर गरजू साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रभागातील सर्व रिक्षा चालक, मालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक व कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उपस्थित होते.