Thursday, December 5, 2024
Home ताज्या चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय? -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय? -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात आहेत काय? -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत की काय? असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला.
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीसाठी आलेल्या मंत्री श्री. मुश्रीफ यांना पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारबद्दल नाराजी व आंदोलन केल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्या वेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. १०२  व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार नाहीत. तसेच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही व गायकवाड समितीचा अहवालही विश्वासार्ह नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेली  विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, गेले अठरा महिने राज्य सरकार  चांगले चाललेले आहे. सरकार तर पाच वर्षे चालणार आहेच आणि त्याचा बोनस त्यानंतर त्यापुढच्या पाच वर्षात मिळणार आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली “सेव्ह मेरीट-  सेव्ह नेशन” ही संघटना भाजप आणि आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोप करतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, या संघटनेचे पदाधिकारी भाजप आणि आरएसएसचेही पदाधिकारी आहेत.

चौकट…….. “संभाजीराजेच्या भूमिकेचे स्वागत…..”
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संभाजीराजे छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटले आहेत. मराठा आरक्षणाबाबत तुझं-माझं करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढू या ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी अनेक विधीतज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे सांगतानाच मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आरक्षणाचे हे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे, केंद्राकडे जावे लागेल. शरद पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबाबत प्रयत्न केले पाहिजेत.

चौकट………
” कुटील राजनीति……”
एकाबाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा प्रयत्न करायचा. दुसऱ्या बाजूला टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे. तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून  आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा तिहेरी डाव आहे असे सांगतानाच मंत्री मुश्रीफ म्हणाले, काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments