आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिनी ‘गरजूंना मदत’ करण्याचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांचा ३१ मे रोजी वाढदिवस आहे. या दिवशी गरजूंना मदत ही संकल्पना घेऊन वाढदिवसा निमित्त कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी आपल्या भागातील, परिसरातील, गावातील गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल त्या प्रमाणे मदत करावी असे आवाहन आ.ऋतुराज पाटील यांनी केले आहे.
आमदार ऋतुराज संजय पाटील यांचा ३१ मे रोजी वाढदिवस आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. कोरोनामुळे समाजातील अनेक लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजंदारी करून पोट भरणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या गरजू लोकांना धान्य वाटप, जेवण तसेच कोणत्याही स्वरूपाची मदत करून त्यांना आधार द्यावा . तसेच शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी जर काही साहित्याची गरज असेल तर ते साहित्य द्यावे, असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.