Monday, July 15, 2024
Home ताज्या इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून  २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून  २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून  २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
           
गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

इचलकरंजी/प्रतिनिधी : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल – आयसीएस हॉस्पिटलला २५  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता,  पर्याय म्हणून फाउंडेशनच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप जिल्हाभर केले. सीपीआरसह आयजीएम, जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरला ही मशीन्स प्रदान करण्यात आली आहेत. आठवड्यापूर्वीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी आयजीएमला भेट देऊन आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आयजीएम हे लवकरच सर्व सुविधांनी युक्त या भागाच्या वैद्यकीय सुविधेचे अत्याधुनिक केंद्र बनेल, अशी ग्वाही दिली होते.  त्यांचे वचनही लवकरच पूर्ण होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिकचे सदस्य मदनराव कारंड, माजी आमदार राजू किसनराव आवळे, केडीसीसी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, इचलकरंजी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकुमार शेटे, नगरसेवक संजय बेडक्याळे, युवा नेते अमित गाताडे, इचलकरंजी शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम ढालाईत, सुभाष मालपाणी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अभिजित रौदे, संतोष पाटील, संभाजी सूर्यवंशी, मच्छिंद्र नगारे, युवराज जाधव, किरण शेरखाने आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments