सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा वैभववाडी तालुक्यातील करूळ गावाला बसला आहे.गावातील अनेकांच्या घरांची कौले,पत्रे उडून गेले आहेत. तसेच आंबा,काजू, फणस, कलम झाडे याचे नुकसान झाले आहे.शेतकरी, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करा अशा सूचना संबंधीत अधिकार यांना सहकार मंत्री श्री .पाटील यांनी दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत,वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संतोष सावंत,काका कुडाळकर,तहसीलदार रामदास झळके,जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण, सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन सतीष चव्हाण,संचालक दिगंबर पाटील,सहाय्यक निबंधक कणकवली एल.एस.लष्कर,सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, प्रांताधिकारी कणकवली वैशाली राजमाने, सहकार अधिकारी डी.के.चव्हाण, हेमंतकुमार चव्हाण,बाळा कोलते आदी उपस्थित होते.