Monday, July 15, 2024
Home ताज्या कोरोनाचा लहान मुलांना धोका लक्षात घेता बालरोग तज्ञ डॉक्टरांमार्फत महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर...

कोरोनाचा लहान मुलांना धोका लक्षात घेता बालरोग तज्ञ डॉक्टरांमार्फत महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर व नर्सेसना प्रशिक्षण

कोरोनाचा लहान मुलांना धोका लक्षात घेता बालरोग तज्ञ डॉक्टरांमार्फत महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर व नर्सेसना प्रशिक्षण
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या व संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे असे तज्ञांचे मत आहे. त्याची तयारी करण्याच्या दृष्टीने मागील आठवड्यात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील सर्व बालरोगतज्ज्ञ यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली होती. महानगरपालिकेकडून लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड उपचार केंद्र तयार करण्याची तयारी महापालिकेची सुरू आहे. यासाठी महापालिकेच्या मेडिकल स्टाफला ट्रेनिंग देणे आवश्यक होते. त्यानुसार महानगरपालिकेकडील ६ मेडिकल ऑफिसर व १२ नर्सेसना डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज येथे शुक्रवार दिनांक २१ मे रोजी बालरोग तज्ञ डॉक्टरांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज कडील डॉ.कुरणे, डॉ.मोहन पाटील, डॉ.सुहास कुलकर्णी, डॉ.निवेदिता पाटील, डॉ.निगडे, डॉ.प्रिती नाईक, डॉ.मिलिंद, डॉ.रविंद्र पवार, डॉ.देव्यानी कुलकर्णी यांनी प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणामध्ये मध्यम व सौम्य लक्षणे असणाऱ्या मुलांवर करण्यात येणारे उपचार, गंभीर आजारी लहान मुलांना संदर्भ सेवा देणे, धोक्याची लक्षणे कशी ओळखावी, लहान मुलांसाठी कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयांवर बालरोग तज्ञांमार्फत मार्गदर्शन करणेत आले. या प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून डॉ राजेश औंधकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments