मिशन वायू अंतर्गत कोल्हापूर साठी ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’ अंतर्गत ६५ लाखांचे आरोग्य साहित्य प्राप्त झाले आहे . जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर या ठिकाणी हे साहित्य देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली .
मिशन वायू मोहिमेच्या अंतर्गत आजअखेर एकूण ७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ बायपॅक व्हेंटिलेटर मशीन कोल्हापूर जिल्हयात देण्यात आली आहेत. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत प्रत्येकी ६० हजार रुपये तर बायपॅक व्हेंटिलेटर मशीन ची किंमत प्रत्येकी साडे चार लाख रुपये आहे .
कोरोनाच्या लढाईमध्ये रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले .