Friday, July 19, 2024
Home ताज्या युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याने कारणे दाखवा नोटीस

युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याने कारणे दाखवा नोटीस

युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याने कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील फोर्ड कॉर्नर येथील युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याने सहा.आयुक्त चेतन कोंडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरामध्ये एचआरसीटीसाठी जादा दर आकारत असल्याच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील डायग्नोस्टीक सेंटरची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजता उप-आयुक्त शिल्पा दरेकर व सहा.आयुक्त विनायक औंधकर व चेतन कोंडे यांनी फोर्ड कॉर्नर येथील युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरला अचानक भेट देऊन तपासणी केली. यावेळी याठिकाणी या सेंटरने रुग्णांकडून एचआरसीटीसाठी जादा दर आकारलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर डॉक्टरांच्या शिफारस पत्राशिवाय १० रुग्णांचे एचआरसीटी स्कॅन केले असलेचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कोवीड आणि नॉन कोवीड रुग्णांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केलेली नव्हती. सेंटरमध्ये सोशल डिस्टंन्स पाळले जात नव्हते. सेंटरचा बाहेर कोणताही सुचना फलक लावलेला नव्हता. येणाऱ्या रुग्णांना व नागरीकांसाठी सॅनिटाईजर अंशत: केले जात असलेचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णांची ही लूट व गैरसोय होत असलेचे निदर्शनास आलेने शासनाने ठरवून दिलेल्या दराचे उल्लघंन केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत खुलासा करणे बंधनकारक केले आहे. वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्या व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम व कोवीड उपाययोजना नियमांअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments