Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कोवीड सेंटर सुरु करण्यासाठी महापालिकेकडे मागणी अर्जा सोबत आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता करावी...

कोवीड सेंटर सुरु करण्यासाठी महापालिकेकडे मागणी अर्जा सोबत आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता करावी  

कोवीड सेंटर सुरु करण्यासाठी महापालिकेकडे मागणी अर्जा सोबत आवश्यकत्या कागदपत्रांची पुर्तता करावी
कोल्हापूर/प्रतिनिधी :  शहरामध्ये खाजगी हॉस्पीटलमध्ये अथवा इतर ठिकाणी कोवीड सेंटर सुरु करण्यासाठी दैनंदिन अर्ज महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. सदरचे अर्ज करताना त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा याच्या माहितीच्या कागदपत्रासह महापालिकेकडे अर्ज करावा असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे. सेंटर चालू करण्याच्या मागणी अर्जाबरोबर स्वयंसेवी संस्थांनी ज्या ठिकाणी कोवीड सेंटर सुरु करणार आहे. त्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर व इलेक्ट्रीकचा ऑडीट रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफची नावानिशी यादी. सेंटरमध्ये आकारण्यात येणाऱ्या फि चा उल्लेख अथवा मोफत असल्यास तसा उल्लेख करावा. चहा, पाणी, नाष्टा व जेवणाची काय व्यवस्था आहे. ऑक्सीजन बेडची व्यवस्था करणार असाल तर त्याचाही ऑडिट रिपोर्ट जोडावा. रुग्णांसाठी टॉयलेट बाथरुमची व्यवस्था, उपलब्ध बेडची संख्या व यासह  इतर सर्व व्यवस्था यांची माहिती अर्जा सोबत द्यावी. हॉस्पीटलमध्ये कोवीड सेंटर सुरु करणार असल्यास नर्सींग ॲक्टचे सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व सेंटरनी बायोमेडीकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी एजन्सी बरोबरचा करार असावा. या सर्व बाबींची पुर्तता करुनच महापालिकेकडे कोवीड सेंटर सुरु करण्यासाठी अर्ज करावा. त्यासोबत कागदपत्रे जोडावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments