आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून गिरगाव कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर प्रदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी गिरगावमधील कोव्हीड सेंटरला भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून १० लिटर क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिला. या माध्यमातून येथे येणाऱ्या रुग्णांची सोय होणार आहे. गिरगाव येथील युवकांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गिरगाव-पाचगाव इथल्या राजर्षी शाहू निवासी शाळेमध्ये शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरू केले आहे. आ.पाटील यांनी या सेंटरला भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली .
यावेळी आ..पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकट काळात गिरगावमधील युवकांनी पुढाकार घेऊन शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरू करून आदर्शवत पाऊल टाकले आहे. या मुळे या परिसरातील रुग्णांना चांगली सेवा मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच येथील स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, फेस शिल्ड, पॉकेट सॅनिटायझर, ग्लोव्हज साहित्य देण्यात येणार आहे.यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी या कोव्हीड सेंटरची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिला. यावेळी या सेंटरचे समन्वयक रुपेश पाटील यांनी सेंटरच्या कामाची माहिती दिली.
यावेळी पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच जालंधर पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव,ग्रामसेवक पूनम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, उत्तम विष्णू पाटील, उत्तम बापू पाटील, जालिंदर पाटील, सुभाष पाटील, निलेश सुतार, ज्ञानेश्वर साळोखे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्यासह गिरगावमधील युवक, माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.