Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कडक लॉकडाऊनमूळे जनतेचे हाल

कडक लॉकडाऊनमूळे जनतेचे हाल

कडक लॉकडाऊनमूळे जनतेचे हाल

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना आजारामुळे जनतेचे भयानक हाल होत असून जनता दुहेरी संकटात सापडलेली आहे इकडे कोरोना आजार लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे तर दुसरीकडे प्रशासनाने लावलेला लॉकडाऊन मुळे जनतेची मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत लोकांना सकाळी व संध्याकाळी भाजीपाला घरपोहोच मिळेल धान्य घरपोच मिळेल असे प्रशासनाने जरी जाहीर केले असले तरी शहरातील प्रत्येक धान्य दुकानदार यांनी आपल्या किरकोळ दुकानाबाहेर मात्र दुकान बंद राहील असे फलक लावल्याने गोरगरीब सर्वसामान्य जनतेला हाताश व्हावे लागत आहे याबाबत त्वरित उपाययोजना स्थानिक आमदार नगरसेवक व कार्यकर्त्यांनी करणे अत्यंत आवश्यक बनले आहे अन्यथा कोरोना राहिला बाजूला उपासमारीने जनता हैराण होऊन मरून जाईल याला जबाबदार मात्र निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व लॉक डाऊनसारखे नियम लावलेले प्रशासनाधिकारी हेच असतील असे जनतेमधून बोलले जात आहे एकीकडे कोरोना आजाराने लोकांचा जीव गुदमरून चाललेला हे लोक एका दहशतीखाली वावरत असून अनेक सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ आलेली आहे आज पहिल्याच दिवशी लोकांची ही अवस्था झाली असेल तर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये लॉकडाऊन केल्याने उपासमारीने घरांमध्ये मरावे लागेल असे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे या गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा विचार करून स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी या गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे बाजार समित्यांमध्ये धान्य दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतामध्ये आहे हा सर्व माल जर स्थानिक पातळीवर त्या त्या लोकप्रतिनिधींनी खरेदी करून या आठ दिवसांमध्ये जर लोकांना पुरविला तर लोकांच्या या उपासमारीचा काहीतरी भाग कमी होऊन त्यांना जीवन जगण्याची थोडी तरी आशा मिळेल.रोजचे काम धंदा करून दोन वेळेचे पोटाची खळगी भरणारी या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला खरंच कोण वाली नसल्याचे या लॉकडाऊनच्या माध्यमातून दिसून येत आहे त्यांच्या आठ दिवसाच्या उदरनिर्वाहाचा आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचाही विचार होणे अत्यंत आवश्यक आहे सध्या सर्वच बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे त्यांनी मात्र घरामध्ये काही प्रमाणात धान्य भरून ठेवले आहे. मात्र ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही अशांनी काय करायचे त्यांना नजीकची दुकानांमधून तरी माल मिळणे अत्यंत आवश्यक आहे मात्र त्यांनीही आपले दरवाजे बंद केल्याने या सर्वसामान्य लोकांनी जायचे तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.अजून आठ दिवस आहे आणि ते कसे काढायचे हा मोठा प्रश्न या गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसमोर उभा ठाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments