सलाम गिरगांव मधील जवानांना गावासाठी दिले ऑक्सिजन मशीन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगांव ता.करवीर येथील सर्जेराव कुरणे या कारगिल युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता.पुन्हा ही स्थिती कोणावर येऊ नये म्हणुन गावातील सीमेवर तैनात असलेल्या आजी सैनिकांनी गावात सुरू असलेल्या कोविड सेंटरला आज ऑक्सिजन मशीन भेट दिले.गावात सुट्टीवर असलेल्या जवानांनी हे मशीन रुपेश पाटील आणि भास्कर कुरणे यांच्याकडे सुपूर्द केले.सैनिकांची ही मदत लाखमोलाची ठरली आहे. सीमेवर देशासाठी लढताना आपल्या पंचक्रोशीतील नागरिकांसाठीही त्यांनी आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगी गिरगांव येथील जवानांनी केलेल्या योगदानाला माय मराठी न्यूज कडू न सलाम.