ग्रोबझ इंडिया निधी बँक आणि कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना सारख्या चाललेल्या महामारी आपला जीव धोक्यात घालून आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत अशा कोल्हापूर शहरातील बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधव व महानगरपालिका कर्मचारी आरोग्य कर्मचारी, पत्रकर, एसटी महामंडळाचे कर्मचारी व गरीब गरजू बांधवांसाठी जेवण पाणी व N95 मास्क देण्याचे बहुजन पत्रकार संघ व ग्रोबझ इंडिया निधी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शाहुपुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. परशुराम कोरके व स्मिता पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांच्या उपस्थितीने स्टँड येथे दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, शाहू टोल नाका, रेल्वे स्टेशन, दसरा चौक, व शहरातील इतर ठिकाणी हा उपक्रमाची राबविण्यात आल. यावेळी शाहूपुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. परशुराम कोरके यावेळी सांगितले की ज्या दिवशी पासून लाॅक डाऊन चालू आहे त्या दिवशी पासून कोल्हापुरातील विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी रोज ड्युटीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांना वेळोवेळी चहा, नाष्टा, जेवण, पाणी वाटप करून कशाचीही कमतरता भासू दिली नाही, व नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि विनाकारण रस्त्यावर फिरू नये, विनाकारण फिरणारा यांच्यावर वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली जाईल असे त्यांनी बोलताना सांगितले, यावेळी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष रवी कोल्हटकर, मुबारक आत्तार, रवी सागर हाळवणकर, प्रताप घोरपडे, ग्रोबझ कंपनीचे सीएमडी विश्वास कोळी, सचिन कदम, राजेंद्र डंगे, आफताब खान, यश रुकडीकर, सुशांत मिरजकर,संदीप पोळ कंपनीचे व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.