पाकिस्तानातल्या मराठी बांधवांपर्यंत विशवरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचलेत हे स्वप्नस्टडीजचे कौतुकासपद कार्य – मा.श्रीमंत.खा.युवराज छ.संभाजीराजे
सातारा/प्रतिनिधी : पाकिस्तानातल्या मराठी बांधवांपर्यंत महाराष्ट्रातल्या थोर विचारवंतांचे कार्य पोहोचवण्याचे काम सातारा येथील स्वप्नस्टडीज या संस्थेमार्फत होत आहे.हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे इतिहासात पहिल्यांदाच कराची येथे छ.शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली,क्रांतिसूर्य महात्मा फुलेंची जयंती साजरी झाली,मराठी भाषा दिन साजरा झाला आणि आज काराचीतील मराठी बांधव विशवरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहेत.या ऐतिहासिक सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं याचा मला अभिमान आहे.स्वप्नस्टडीजने आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन जयंतीच्या कार्यक्रमाला ते अध्यक्ष म्हणुन मार्गदर्शन करत होते.आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तान मधील मराठी नागरिकांनी सुरू केलेल्या भारत-पाकिस्तान मराठी सेवासंघाचेही कौतुक केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याही उपस्थित होत्या.पाकिस्तान मधील मराठी महिलांनी अनेक प्रशन विचारुन त्यांच्या सिनेप्रवासाची माहिती करून घेतली.या चर्चेत सोनाली कुलकर्णी यांनी अत्यंत उत्साहाने प्रश्नांनी उत्तरे दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रा.डॉ.नारायण टाक यांनी मांडले आणि जातीय निर्मूलनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विषद केले.पाकिस्तान मधुन श्रीमती.मंगला श्रर्माजी MPA Gov of Sindh श्री.रमेश मानजी Former Member film Censor board gov of sindh प्रा.कुमारजी Educationist श्री.चंदर कोहलीजी श्री.करण कुमार मनोंदरजी हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला दुबई,बहरिन,नेपाळ,येथून देखील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच काराचीतील मराठी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रास्ताविक स्वप्नस्टडीजचे संचालक दिलीप पुराणिक व स्वप्नील पुराणिक यांनी केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा परिचय श्रुती पुराणिक यांनी करून दिला.आभार प्रदर्शन स्वप्नस्टडीजचे व्यवस्थापक नानक जाधव यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला संदीप पारखी बहरिन येथुन तर राहुल पाटील काठमांडु येथुन उपस्थित होते.