कसबा बावड्यातील महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात साठ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मधील कसबा बावड्यातील महानगर पालिकेच्या कचरा प्रकल्पात जेसीबीच्या धक्क्याने महिलेचे शिर धडापासुन वेगळे झाल्याची घटना आज घडली आहे.तीन तासांच्या अंतरांनंतर महिलेचे शीर पोकलँड मधील कचर्यांमध्ये सापडले.पोकलँड चालक याच्यावर कारवाई केली जाईल.
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथे झूम प्रकल्प आहे याठिकाणी अनेक कचरा वेचक महिला कचरा वेचत असतात आजही शिवाजी पेठ येथील मंगल श्रीपती दावने (वय.६० रा.आठ नंबर शाळा शिवाजी पेठ.)असे या अंत झालेल्या दूदैवी महिलेचे नाव आहे.दोघा पोकलँड चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या कसबा बावडा या ठिकाणचा कचरा प्रकल्पात जेसीबीचे कचरा सपाटी करण्याचे काम आज सकाळी सुरू असताना कचरा वेचणारी महिला मंगल राजेंद्र दावणे या महिलेला जेसीबीचा मानेत घुसल्याने धड वेगळे व शीर वेगळे झाले. या घडलेल्या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.महापालिकेच्या वतीने हे काम चालू होते.