Monday, July 15, 2024
Home ताज्या दर्पण फाऊंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

दर्पण फाऊंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

दर्पण फाऊंडेशने जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर/प्रतिनिधी :  खर तर दर्पण फाऊंडेशनचा आजचा हा पहिलाच शैक्षणिक व सामजिक भान जपणारा उपक्रम.अखिलेश सूर्यकांत करोशी या हुशार , होतकरू अनाथ मुलाचं पालकत्व आपल्या फाऊंडेशनचे सन्माननीय सदस्य श्री .सुनिल पाटील व सौ. चारूलता पाटील यांनी स्वीकारलं आहे. त्याचबरोबर त्यांना उजळाईवाडी येथील रविराई ट्रस्ट यांनी मोलाची साथ दिली. सध्या या मुलाला पुण्यातील नामवंत अशा COEP या इंजिनियरिंग कॉलेजला काँप्युटर सायन्सला प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला आहे . त्याच्या चार वर्षाच्या इंजिनियरिंग च्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. 5सामाजिक ऋण लक्षात घेऊन दर्पण फाऊंडेशनने आपल्या पहिल्या उपक्रमाची सुरुवात या विद्यार्थ्याला आर्थिक मदतीच्या रुपात दर्पण फौंडेशनचे सामाजिक विभाग प्रमुख संजय कडगावे यांचे हस्ते १०००० रुपये मदत देऊ केली .या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी रविराई ट्रस्टचे विश्वस्त महेश धर्माधिकारी,चंद्रशेखर पाटील,सावली केअर सेंटर चे किशोर देशपांडे,शिक्षक नेते भरत रसाळे सर, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर सावंत , उमेश देसाई , उत्तम कुंभार , जोतीबा जाधव उपस्थित होते.दर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील सर यांनी या सामाजिक उपक्रमा विषयी माहिती दिली. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्या विषयीची फाऊंडेशनची भुमिका स्पष्ट केली.याप्रसंगी  फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राम भोळे सर,सचिव संजय कडगावे सर,खजिनदार युवराज सरनाईक सर,महिला आघाडी प्रमुख सविता देसाई मॅडम,सहसचिव सचिन यादव सर उपस्थित होते.तसेच दर्पण फाऊंडेशनचे सक्रिय सभासद संजय पाटील,सुनिल पाटील,चारूलता पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments