कोल्हापूर मधील सराफ व्यावसायिकाचा राधानगरी तलावात बुडून मृत्यू
कोल्हापूर/राधानगरी प्रतिनिधी : राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोल्हापूर मधील सराफ व्यावसायिकाचा बुडून मृत्यू झाला.विवेक कमलाकर नागवेकर (वय -४५, रा, एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती की, रंगपंचमी व गुडफ्रायडेची सुट्टी असल्याने कोल्हापूर येथील सागर घाटगे, आशिष पाटील, अखिल नागारजी, मनाल जाधव, महेश खालीपे व मयत विवेक नागवेकर हे सात जण राऊतवाडी धबधब्या जवळ असलेल्या क्षितिज होम स्टे येथे सकाळी ११ वाजता जेवणासाठी आले होते. दुपारी जेवण करून त्यातील तिघेजण चार वाजता पोहण्यासाठी धरणातील पाण्यात उतरले. विवेक नागवेकर हा पाण्यात खोलवर गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने विवेकचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी ७ वाजता विवेकचा मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह बाहेर काढून सोळाकुर येथे तपासणी व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबल करीत आहेत.