कोव्हीड नियमांचे उल्लंघन केलेल्या २ हॉटेल यांच्यावर कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालून शासनाचे नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. यासाठी महापालिकेने विविध भरारी पथके स्थापन केली असून या पथकामार्फत शहरामध्ये कारवाई सुरु आहे.शुक्रवार दि.२ एप्रिल २०२१ रोजीअतिरिक्त आयुक्त नितिन दसाई यांनी भरारमार्गदर्शनाखाली संध्याकाळी रात्री ८ वाजता शहरातील रेस्टॉरंट हॉटेल याची तपासणी केली यावेळी दोन हॉटेलवर नियमाचे उल्घन झालेबद्दल त्यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार असे एकुण रु. ४०००/- दंड वसूल करण्यात आला.प्रतिभानगर रेड्यांची टकरी हुतात्मास्मारक येथे विनापरवाना ज्येष्ठनागरिकांना घेऊन कार्यक्रम केलेबाबतरु.१०००/- दंडाची कारवाई करण्यातआली. याप्रमाणे एकुण रु. ५०००/- हजार दंड वसूल करण्यात आला. यावेळी चालक अधिवारी मनिष रणभिसे व अग्निशमचे कर्मचारी उपस्थित होते.
कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी नियमाचे पालन करूनच व्यवसाय करावा मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले आहे.