Tuesday, October 15, 2024
Home ताज्या महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ -सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ -सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ -सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर/(जिल्हा माहिती कार्यालय) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापही मोठ्या संख्येने प्रलंबित असल्याने शासन स्तरावरून महाडीबीटी प्रणालीवर अर्ज स्विकारण्यास १५ एप्रिल पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांबाबत स्विकृतीची कार्यवाही तात्काळ करावी व संस्थेतील पात्र असणारा एकही मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. अशा विद्यार्थ्यांची परिपूर्ण स्वरूपातील अर्ज छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईनरित्या सादर करावयाचे आहेत. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीमधुन महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणी करू नये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
महाविद्यालयाकडून जर विहीत कालावधीत अर्जाबाबत कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले तर अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय जबाबदार राहील. या कालावधीत महाविद्यालयांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments