कोरोनाचा काळ असतानाही रंगपंचमी उत्साहात साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या कोरोनाचा कालावधी सुरू असतानाही कोल्हापूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमी निमित्त चौकाचौकात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र आनंदाने एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करत ही रंगपंचमी साजरी झाली यावेळी लहान मुलांसह मोठ्यांनी या रंगपंचमी मध्ये सहभाग नोंदवला होता रंगपंचमीमध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या.
यावर्षी कोरोनाचे सावट होते त्यामुळे बाजारामध्ये रंगपंचमीचे साहित्य खरेदी करण्यासाठी जशी गर्दी नेहमी होते तशी गर्दी यावर्षी मात्र ही गर्दी पहावयास मिळाली नाही. त्यामुळे रंगपंचमीचे साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर मात्र अन्याय झाला आहे त्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकले नाही त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला तरी कोल्हापूर जिल्ह्यात व शहरात ही रंगपंचमी आनंदी व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.