३१ मार्च रोजी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार – नवाब मलिक पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द
मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस त्यांची औषधे बंद करण्यात आली आहेत. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल.
त्यामुळे शरद पवारसाहेबांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.