इंधन दरवाढविरोधात काँग्रेसचे २६ मार्च रोजी उपोषण
कराड/प्रतिनिधी : शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे तसेच इंधन दरवाढ याविरोधात आज २६ मार्च रोजी शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षातर्फे देशपातळीवर पाठिंबा देण्यात आला आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून कराड दक्षिण काँग्रेस कमिटी व कराड शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने कराड येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर आज २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपोषण करण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच हे उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे व कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.