Friday, January 17, 2025
Home ताज्या कोल्हापूरमध्ये नवग्रह रत्न केंद्र सुरू, याठिकाणी नवग्रहरत्न उपलब्ध होणार

कोल्हापूरमध्ये नवग्रह रत्न केंद्र सुरू, याठिकाणी नवग्रहरत्न उपलब्ध होणार

कोल्हापूरमध्ये नवग्रह रत्न केंद्र सुरू, याठिकाणी नवग्रहरत्न उपलब्ध होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोणताही व्यवसाय असो तो वडिलोपार्जित असेल आणि पारंपारिक असेल तर कुटुंबातील सर्वजण अंगीकार करून तो व्यवसाय अधिक वृद्धिंगत करत असतात. असाच वारसा अन्नू. एच. मोतीवाला या चालवित आहेत. वडीलोपार्जित असणारी रत्नपारखी विद्या त्यांनी जोपासली असून कोल्हापूरमध्ये ‘नवग्रहरत्न केंद्र’ येथील असेंब्ली रोड शाहूपुरी येथे सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अंकशास्त्र,जोतिषशास्त्र कुंडली, हस्तरेखा आणि फेसरिडींग याच्यावरून अभ्यास करून रत्न सुचविणे हे काम या केंद्राद्वारे अन्नू.एच. मोतीलाल या करणार असून आपल्या आयुष्यात खऱ्या रत्नांचे किती महत्त्व आहे याची माहिती आणि या नवरत्न याची उपलब्धता केंद्राच्या माध्यमातून करून देणार असल्याची माहिती अन्नू. एच. मोतीवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गुजरात येथील कै. एच.के. मोतीवाला हे निपाणी मध्ये आले आणि त्यांनी निपाणी येथे १९९५ मध्ये शुभरत्न केंद्र सुरू केले. लहानपणापासूनच त्यांनी ही कला आपल्या वडिलांकडून व आजोबांकडून अवगत केली होती. दुबई, अमेरिका,श्रीलंका इंग्लंड यासारख्या विविध देशांमध्ये त्यांना डायमंड शोधण्यासाठी बोलवले जात होते डायमंडची त्यांना चांगली पारख होती त्यामध्ये ते पारंगत होते त्यामुळे फॉरेन केंद्रांमध्येही त्यांना बोलविण्यात येत होते. आयुष्यात जसे नवग्रह आहेत तसेच नवरत्नही आहेत. रत्नपारखी ही पारंपरिक व मौल्यवान विद्या आहे. पाच पिढ्यांपासून मोतीवाला रत्न शास्त्री यांनी रत्नपारखी ची विद्या जोपासली आहे.या नवरत्नांमध्ये माणिक, मोती, प्रवाळ,पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद आणि लसण्या असे रत्न आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत यामधील मोती आणि प्रवाळ हे जलजन्य रत्न असून ते जंतूंपासून तयार होतात तर माणिक,पाचू,पुष्कराज, हिरा, नीलम व गोमेद लसण्या ही खनिजेरत्ने आहेत त्यांचे रंगही वेगळे असतात मी रत्नपारखीची डिग्री गुजरातमध्ये घेतली असून वयाच्या तेराव्या वर्षापासून मी याचे ज्ञान ग्रहण केले असल्याचे अन्नू.एच मोतीवाला यांनी सांगितले. ही नवग्रह नवरत्न धारण केल्याने आयुष्यात व्यवसाय,नोकरी,जादूटोणा, शिक्षण,विवाह जुळणे, कोर्टकचेरी या सर्व बाबतीत लोकांना मार्गदर्शन मिळते. असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.या केंद्राचे उदघाटन आज डॉ. प्रांजली अमर धामणे (फिजिओथेरपीस्ट) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पत्रकार परिषदेला श्री.विजय भोसले, सत्यजित भोसले,यशोधरा भोसले,पल्लवी देसाई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments