Friday, December 13, 2024
Home ताज्या कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा चिघळला

कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा चिघळला

कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा चिघळला

कोल्हापूर/प्रतिनिधी : बेळगाव शहरात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत रामलिंग खिंड गल्ली येथे शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची तोडफोड केली असूनही हा प्रकार घडल्यामुळे शिवसैनिकांचा सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांनी धर्मवीर संभाजी चौक येथे रास्ता रोको करत या घटनेचा निषेध केला आहे हल्ला करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. शिवसेनेचे बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर काही कन्नड वैदिकांनी अचानक हल्ला करुन गाडीची तोडफोड केली व गाडीवरील ध्वज हटविला या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून आज महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये एकही एस. टी. बस गेली नाही तर कर्नाटक मधून येणार नाही आणि कर्नाटक मधून ही येणारी एस. टी. बस कोल्हापूरमध्ये अडविण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक मध्ये पुन्हा एकदा सीमावाद निर्माण झाला असून शिवसैनिकांनी महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन सुरू केले असून हा सीमा बाद कधी थांबणार हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्रमध्ये कर्नाटक मधील बिदर भालकीसह कारवार हा भाग मराठी भाषिकांचा असून तो महाराष्ट्र मध्ये सामील करावा अशी मागणी बऱ्याच वर्षापासून घोंगावत आहे मात्र यांना मूर्तस्वरूप कधीच आलं नाही कर्नाटक मध्ये भाजपची सत्ता होती आणि महाराष्ट्र मध्येही भाजपची सत्ता होती त्यावेळीही भाजपने
विचार नकळत केलेला नाही त्यांना त्यावेळी सहज शक्य होते मात्र त्यांनी ते केले नाही आताही हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर कन्नड वैदिकांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली ही घटना निषेधार्ह असून कर्नाटक मधील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप त्यामुळे निर्माण झाला असून कर्नाटक मध्ये मराठी आणि अन्य वाद थांबणार कधी असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.कर्नाटक व महाराष्ट्र वाद गेली बऱ्याच वर्षांपासून आहे.महाराष्ट्रातील कारवार,बेळगाव,बिदर,भालकी हे भाग महाराष्ट्र मध्ये सामील करावेत अशी मागणी वर्षानुवर्षे केली जात आहे.मात्र याबाबत कोणीच आतापर्यंत ठोस कारवाई केली नाही याठिकाणी राहणारे मराठी भाषिक यांच्यावर नेहमी अन्याय केला जात आहे.याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही खूप हाल आहेत.त्यांना कन्नड शिक्षणही शिकावे लागत आहे.कर्नाटक मधून नेहमी मराठी भाषिक यांना वेगळी वागणूक दिली जात आहे.यासाठी अनेकदा शिवसेनेने आंदोलने केली आहेत. शिवाय याठिकानच्या मराठी भाषिकांसाठीही लढा दिला आहे.गुन्हे दाखल करून घेतले आहेत.काल घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्र व कर्नाटक मधील एस. टी. बस ही बंद केली आहे.त्यामुळे यात प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत.
बेळगाव मधील सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा अशी मागणी करत आता हे आंदोलन पुन्हा चिघळले असून कोल्हापूरमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी एसटी बस अडविली शिवाय कन्नड फलकही काढण्यात आले. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून कोणत्याही परिस्थितीत हा भाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे यासाठी आता राज्य सरकार ही आग्रही असून हा वाद चिघळला आहे.आणि आता तो किती दिवस चालू राहील हेही सांगता येत नाही.शिवसैनिक मात्र आक्रमक झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments