Tuesday, October 15, 2024
Home ताज्या महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे पुनर्गठन कार्यकारी अध्यक्ष पदावर श्री.राजेश क्षीरसागर कायम

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे पुनर्गठन कार्यकारी अध्यक्ष पदावर श्री.राजेश क्षीरसागर कायम

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे पुनर्गठन कार्यकारी अध्यक्ष पदावर श्री.राजेश क्षीरसागर कायम

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे शासनाने पुनर्गठन केले असून, या समितीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दि.१७ जून २०१९ रोजी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या होत्या. परंतु, राज्य नियोजन मंडळ सुरूच ठेवले होते. या राज्य नियोजन मंडळ, मुंबई यांचे शासनाने दि.०९ मार्च २०२१ रोजीच्या शासन आदेशान्वये पुनर्गठन केले असून, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदावर श्री.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. यासह त्यांना या पदास “मंत्री दर्जा” देण्यात आला आहे. यासह मंत्री दर्जास अनुज्ञेय कार्यालय, सुरक्षा, कर्मचारी, वाहन आदी सुविधा त्यांना देण्यात आल्या आहेत. मंत्रालय समोरील प्रशासकीय इमारती मध्ये १८ व्या मजल्यावर या समितीस कार्यालय देण्यात आले आहे. या समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री. अजित पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री नाम.श्री.धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री नाम.मा.श्री.के.सी.पाडवी, नियोजन राज्यमंत्री नाम.मा.श्री.शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी काम पाहतील.
श्री.राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या राजेश क्षीरसागर यांना सन २००५ च्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर २००७ साली शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर निवड या कालावधीत चळवळीच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सन २००९ मध्ये शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. यामध्ये विजयश्री मिळवीत राजेश क्षीरसागर विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर पुन्हा २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवीला. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत शिवसेना पश्चिम महाराष्ट्र पक्षप्रतोद म्हणून भूमिका बजावली आहे. त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील कामामुळेच त्यांना या पदावर कायम ठेवून काम करण्याची संधी पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, राज्य नियोजन मंडळ, नियोजन विभाग, महाराष्ट्र राज्य हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग असून, नियोजन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे काम या विभागाचे प्रमुख कार्य आहे. यासह मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत मानव विकासावर आधारीत योजना राबविणे याकरिता रु.४०० कोटी निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. यामाध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments