महिला दिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनीधी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,महिला आघाडी ,शाखा कोल्हापूर शहर यांच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सत्कार व स्नेहमेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात अन्यायग्रस्त स्त्रियांच्या साठी ,उपेक्षित महिलांसाठी काम करणारी राजमाता जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या अध्यक्षा सुनिता पाटील व त्यांच्या कार्यकर्त्या तसेच आदर्श शिक्षिका सोनाली मोरे ,संगीत सख्या शयराज मणेर , स्मिता पुनवतकर,सरिता सुतार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.पुष्पा परीट ,सौ सुधा इंदुलकर,सौ गीता हसुरकर उपस्थित होत्या .या वेळी आशालता कांजर ,स्मिता पुनवतकर, सुवर्णा सोनाळकर ,सुधाकर सावंत ,उमेश देसाई, संजय पाटील , सुनिता पाटील यांनी आपले विचार व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सौ शकुंतला मोरे ,नयना बडकस डॉ.स्वाती पाटील ,सुनील पाटील ,विष्णू परीट ,सुरेश केरुरे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ केरुरे यांनी केले व आभार संजय कडगावे यांनी मांनले .राजमाता जिजाऊ ब्रिगेड च्या कार्यकर्त्या व सत्कार मूर्तीनी कार्यक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले व नेटक्या नियोजनाबद्दल संघटनेला धन्यवाद दिले .