पिंपळगाव बुद्रुक गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ
कोल्हापूर/प्रतिनिधी : पिंपळगाव बुद्रुक, ता.कागल येथील खंबलिंग मंदिर परिसर पेविंग ब्लॉक, दलित वस्ती पेविंग ब्लॉक बसवणे अश्या विविध विकास कामाचे उद्घाटन शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्याचे युवानेते व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बापूसो पाटील सरपंच बंडेराव सुर्यवशी, अजित पाटील, शंकर पाटील, आनंदा मांगोरे, मिलींद माने, उपसरपच युवराज डाफळे, शामराव पोवार, सखाराम गपरे, सखाराम डावरे, संभाजी सुर्यंवशी, भरत पाटील, बाळासो शिंदे, पंडित सुर्यवशी व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.