नानीबाई चिखली येथील जळीतग्रस्त शेतकऱ्याला ना.हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात
कोल्हापूर/प्रतिनिधी : नानीबाई चिखली येथील शेतकरी श्री.आप्पासो राउ गळतगे यांच्या जनावरांचा गोट्याला अचानक आग लागून, त्यांची दोन दुभती जनावरे गायी मयत झाल्या. तसेच संपूर्ण गोठा जळून खाक झाला, त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.नविद मुश्रीफ साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गळतगे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविणदादा भोसले, बशीर नदाफ, श्रीशैळ नुल्ले, मुकुंद गळतगे, योगेश तुकान, राजू चौगुले व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.