ब्रह्मपुरी येथे चालू असलेले काम हे कायदेशीर – जीवन आवळे
कोल्हापूर/प्रतिनिधी : बॉम्बे डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रा. लि. या संस्थेचे चालू असलेले डागडुजीचे कामकाज हे कायदेशीर असून शिवसेनेचे चुकीच्या माहितीच्या आधारे दादागिरी करून काम बंद पाडले आहे ही बाब अत्यंत वाईट असून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कागदपत्रांची चौकशी न करता कोणाच्यातरी सांगण्यावरून बेकायदेशीर जमाव जमवून शिवसेनेने नाहक विनाकारण काम बंद पाडले आहे असा आरोप जीवन आवळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
या ट्रस्टची प्रॉपर्टी ही बॉम्बे डायोशेसन ट्रस्ट असोसिएशन प्रा. लि. या संस्थेचे असून याबाबत न्यायालयाने सुद्धा बेकायदेशीर मालकी लोकांच्या विरोधात निकाल दिला आहे आजही ही मिळकत संस्थेच्या नावावर असून तसे कागदोपत्री पुरावे ही आमच्याकडे आहेत सदर संस्थेमध्ये अंध मूकबधिर अपंग लोकांचे शासकीय प्रशिक्षण सुरू करण्याचे असल्याने आम्ही संस्थेच्यावतीने डागडुजी करत आहोत परंतु काही आपमतलबी लोकांनी आपमतलबी लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांना चुकीची माहिती दिली आहे व मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने शिवसेनेला आंदोलन करण्यास भाग पाडले आहे ही बाब निंदनीय असून शिवसेनेच्या समजदार नेत्यांनी किमान कागदपत्रांची शहानिशा करणे आवश्यक होते पण तसे न करता शिवसेनेने आंदोलन करून हे काम बंद पडले आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे संस्था सनदशीर मार्गाने जात असून न्यायालयाचा आदर करणारी आहे. पोलिसांनीही दादागिरी करणार्यांना पाठीशी घातले असून मिळकतीचे कागदपत्रे तपासणे आवश्यक होते मात्र ते केले गेले नाही.असे आवळे यांनी यावेळी म्हंटले आहे.यावेळी आशुतोष डेविड उपस्थित होते.